8 मोफत गुंतवणूक साधने SIP, EMI, Tax आणि निवृत्ती नियोजनासाठी.
News

Post Office : केवळ २९९ रूपयांत मिळतोय १० लाखांचा विमा, पाहा कसा घेऊ शकता फायदा

3 मिनिटे वाचन
थोडक्यात महत्त्वाचे
  • पोस्ट ऑफिसमार्फत अत्यंत कमी हप्त्यात मोठे अपघात विमा संरक्षण मिळते.
  • ही योजना मुख्यतः अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी संरक्षण देते.
  • IPPB (India Post Payments Bank) खातेधारक यात सहज सहभागी होऊ शकतात.
  • कमी खर्चात कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देणारा हा एक पर्याय आहे.

Post Office : आजच्या काळात विम्याचे (Insurance) महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. अनिश्चिततेच्या या काळात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आधीपासूनच तयार राहणं आवश्यक आहे. आरोग्य विमा पॉलिसीचा प्रीमियम वयानुसार बदलतो.

महागडा विमा घेतला तर त्याचा हप्ताही महाग असतो. अशा परिस्थितीत अनेक लोक आरोग्य विमा काढण्यास टाळाटाळ करतात. हे लक्षात घेऊन पोस्ट खात्यानं एक सामूहिक विमा संरक्षण योजना (Group insurance cover plan) आणली आहे.

हे पण वाचा – Post Office Saving Scheme । पोस्ट ऑफिसची शानदार योजना! 10 वर्षांवरील मुलांचे खाते उघडा, दरमहा मिळतील 2500 रुपये

या विम्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अपघातामुळे रुग्णालयात दाखल झालात तर त्याचा खर्चही तुम्हाला मिळतो. यामध्ये, तुम्हाला उपचारादरम्यान 60,000 रुपयांपर्यंतचा IPD खर्च आणि OPD मध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा क्लेम मिळेल. या विमा योजनेअंतर्गत, तुम्हाला 299 आणि 399 सारख्या अत्यंत कमी प्रीमियमसह 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाते.

काय आहे हा प्लॅन?

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank) आणि टाटा एआयजी (Tata AIG) यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार 18 ते 65 वयोगटातील व्यक्ती या अपघात विमा संरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. दोन्ही प्रकारच्या विमा संरक्षणामध्ये अपघातामुळे मृत्यू, कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व, अर्धांगवायू यासाठी 10 लाख रुपयांचे संरक्षण मिळेल.

त्याच 1 वर्षाच्या समाप्तीनंतर, पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण देखील करावे लागेल. यासाठी विमा घेणाऱ्याचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत खाते असणे अत्यंत आवश्यक आहे.

काय आहेत अन्य फायदे?

या प्लॅन अंतर्गत, काही इतर फायदे देखील 399 रुपयांच्या प्रीमियममध्ये उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रूपये, रूग्णालयात असल्यास 10 दिवसांकरीता प्रतिदिन 1000 रुपये, दुसर्‍या शहरात राहणाऱ्या कुटुंबाच्या वाहतूकीच्या खर्चासाठी 25,000 रुपयांपर्यंतचा खर्च, मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी 5,000 रुपयांपर्यंतचा खर्च दिला जातो. या विम्याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकता.

Web Title: Indian post office special group accident protection insurance cover 10 lakh in just 299 rupees check details investment business news

या विमा योजनेत काय संरक्षण मिळते?

ही योजना प्रामुख्याने अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व यासाठी विमा संरक्षण देते. वार्षिक हप्ता अतिशय कमी असल्याने सर्वसामान्यांना ती परवडते.

हे लक्षात ठेवावे की हे अपघात विमा संरक्षण आहे, आरोग्य विमा किंवा बचत योजना नाही. त्यामुळे कुटुंबाच्या संपूर्ण संरक्षणासाठी इतर विमा पर्यायांसोबत याचा विचार करावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

IPPB किंवा पोस्ट ऑफिस खातेधारक असलेल्या पात्र व्यक्ती ही योजना घेऊ शकतात.
प्रामुख्याने अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी विमा संरक्षण मिळते.
अपघात झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीने आवश्यक कागदपत्रांसह पोस्ट ऑफिस किंवा IPPB कडे दावा दाखल करावा.

हा लेख केवळ माहिती आणि शिक्षणासाठी आहे, गुंतवणूक सल्ला नाही. बाजाराशी संबंधित गुंतवणुकीत भांडवली जोखीम असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या.

पुढे वाचा

आणखी लेख.

  1. Business Idea पर्सनल लोन घेताना हे लक्षात ठेवा टॉप 10 टिप्स | Top 10 Tips for Personal Loan in Marathi 3 September 2026 9 मिनिटे वाचन
  2. News PhonePe चा वापर करून दररोज किती रुपये पाठवू शकतो? 28 August 2026 4 मिनिटे वाचन
  3. Insurance Best Health Insurance in the USA: Understanding Your Options and Benefits 22 August 2026 6 मिनिटे वाचन
  4. गुंतवणूक Understanding Life Insurance in the United States: Types, Coverage, and Choosing the Best Policy 16 August 2026 5 मिनिटे वाचन
  5. Business Idea मोकळ्या जागेत मोबाईल टॉवर बसवा आणि महिना 50 ते 70 हजार कमवा – Mobile Tower Installation in Marathi 10 August 2026 3 मिनिटे वाचन
सर्व लेख वाचा