8 मोफत गुंतवणूक साधने SIP, EMI, Tax आणि निवृत्ती नियोजनासाठी.
गेस्ट पोस्ट

मराठीत लिहा, हजारो वाचकांपर्यंत पोहोचा.

वैयक्तिक अर्थकारण आणि गुंतवणुकीत गती असणाऱ्या तज्ज्ञ, व्यावसायिक आणि अभ्यासू लेखकांचे लेख आम्ही आनंदाने प्रसिद्ध करतो. खाली दिलेले निकष वाचा आणि तुमचा लेख पाठवा.

  • 800 ते 2000शब्दमर्यादा
  • 7 ते 10 दिवसउत्तराचा कालावधी
  • फक्त मराठीलेखाची भाषा
विषय

कोणत्या विषयांवर लिहू शकता.

खालीलपैकी कोणत्याही विषयावरचा लेख चालेल. पाठवण्यापूर्वी तोच विषय अलीकडे प्रसिद्ध झाला नाही ना, हे संकेतस्थळावर तपासा.

निकष

लेख स्वीकारण्याचे निकष.

हे निकष पाळलेले लेख लवकर स्वीकारले जातात, कारण त्यावर संपादनाचे काम कमी उरते.

लांबी

लेख किमान 800 शब्दांचा आणि जास्तीत जास्त 2000 शब्दांचा असावा.

मजकूर

लेख अभ्यासपूर्ण असावा आणि वाचकाला उपयुक्त माहिती, टिप्स किंवा दिशा द्यावी. स्वतःची जाहिरात टाळा. लेख पूर्णपणे नवा असावा आणि इतरत्र प्रसिद्ध झालेला नसावा.

रचना

उपशीर्षके, बुलेट पॉइंट्स आणि छोटे परिच्छेद वापरा. वाक्ये छोटी ठेवा आणि क्लिष्ट पारिभाषिक शब्द टाळा.

संदर्भ

आकडेवारी, अभ्यास किंवा इतर संदर्भ वापरले असतील तर त्यांचा स्रोत द्या.

लेखक परिचय

50 ते 100 शब्दांचा छोटा परिचय पाठवा. त्यात तुमचे नाव, व्यवसाय आणि समाजमाध्यमांचे दुवे असावेत.

छायाचित्रे

लेखात छायाचित्रे जरूर द्या, पण ती वापरण्याचा हक्क तुमच्याकडे असावा आणि ती विषयाशी सुसंगत असावीत. आवश्यक तिथे श्रेय नमूद करा.

प्रक्रिया

पाठवल्यानंतर काय होते.

1

लेख पाठवा

Google Doc किंवा Word फाइल म्हणून लेख पाठवा. छायाचित्रे वेगळी जोडा.

2

आम्ही वाचतो

संपादकीय टीम लेख वाचते आणि निकषांवर तपासते.

3

उत्तर मिळते

7 ते 10 कामकाजाच्या दिवसांत आम्ही कळवतो. लेख स्वीकारला गेल्यास प्रसिद्धीची तारीखही कळवतो.

लेख पाठवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही प्रत्येक लेख माणसाकडून वाचतो, त्यामुळे उत्तर यायला थोडा वेळ लागतो, पण प्रत्येक लेखाला उत्तर मिळते.

लेख स्वीकारला गेल्यास भाषा, शुद्धलेखन आणि रचनेसाठी आम्ही थोडे संपादन करू शकतो. मात्र तुमचा मुद्दा किंवा मत आम्ही बदलत नाही. प्रसिद्धीपूर्वी अंतिम मजकूर तुम्हाला दाखवला जातो.

तुमच्या लेखाची वाट पाहत आहोत.
इन्व्हेस्ट मराठी संपादकीय टीम