8 मोफत गुंतवणूक साधने SIP, EMI, Tax आणि निवृत्ती नियोजनासाठी.
आमच्याविषयी

मराठीत आर्थिक साक्षरता, सर्वांसाठी.

गुंतवणुकीची माहिती इंग्रजीत मुबलक आहे, मराठीत नाही. गुंतवणुकीचे सूत्र अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणारे व्यासपीठ म्हणून इन्व्हेस्ट मराठी सुरू झाले, आणि तेच अंतर भरून काढणे हेच आजही आमचे काम आहे.

  • 44प्रसिद्ध लेख
  • 8मोफत कॅल्क्युलेटर
  • शून्यनोंदणी आणि शुल्क
आमचे ध्येय

आर्थिक निर्णय घेण्यासाठी कोणाच्या मदतीची वाट पाहावी लागू नये. गुंतवणुकीच्या क्लिष्ट संकल्पना मराठीत सोप्या करून सांगितल्या, तर माणूस स्वतःच्या पैशाबद्दलचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. तेच आम्ही करतो.

आमची भूमिका

आम्ही कसे काम करतो.

इन्व्हेस्ट मराठी हे गुंतवणुकीचे सूत्र मराठी माणसाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणारे व्यासपीठ आहे. शेअर बाजार, कर्ज, विमा, Mutual Fund आणि इतर अनेक विषयांवरची माहिती इथे पूर्णपणे मोफत मिळते.

गुंतवणुकीच्या संकल्पना मुळात अवघड नाहीत. त्या अवघड वाटतात कारण त्या बहुतेक वेळा इंग्रजीत आणि पारिभाषिक शब्दांत मांडलेल्या असतात. तीच माहिती रोजच्या मराठीत, उदाहरणांसह आणि आकडेमोडीसह मांडली, तर कोणालाही स्वतःच्या पैशाबद्दलचा निर्णय स्वतः घेता येतो. व्यावसायिक सल्लागाराची वाट पाहावी लागत नाही.

म्हणूनच इथे दोन गोष्टी एकत्र मिळतात. एक म्हणजे लेख, जे संकल्पना समजावून सांगतात. दुसरे म्हणजे कॅल्क्युलेटर, जे तुमच्या स्वतःच्या आकड्यांवर तो विचार तपासून पाहू देतात. वाचून समजले आणि मोजून पटले, तरच निर्णय पक्का होतो.

एक गोष्ट स्पष्ट सांगतो. आम्ही वैयक्तिक गुंतवणूक सल्ला देत नाही आणि कोणतेही उत्पादन विकत नाही. इथली माहिती शैक्षणिक स्वरूपाची आहे. बाजाराशी संबंधित गुंतवणुकीत भांडवली जोखीम असते, त्यामुळे मोठा निर्णय घेण्यापूर्वी सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.