
दंड नियम
भारताचा आयकर कायदा प्रत्येक पात्र व्यक्तीला आयटीआर भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरही आयकर रिटर्न भरण्याची परवानगी देतो परंतु उशीरा आयटीआर दंड आकारतो. जर एखाद्या व्यक्तीने 31 जुलैनंतर आयटीआर फाइल केली तर त्याला 5,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. हे विलंब शुल्क आयकर कलम 234F अंतर्गत आकारले जाते. ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसेल अशा लहान करदात्यांनी 31 जुलैनंतर आयटीआर दाखल केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाईल.

भिन्न कर मर्यादा
वेगवेगळ्या करदात्यांसाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वेगळी ठेवली आहे. सध्याच्या आयकर नियमांनुसार, वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांसाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. 31 जुलै ही ITR दाखल करण्याची अंतिम तारीख आहे आणि ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही अशा करदात्यांना लागू आहे.

शेवटच्या दिवशी रिटर्न भरण्याचे प्रमाण वाढेल
भारताचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी अलीकडेच सांगितले की, शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक आयकर रिटर्न भरतात. त्यांनी सांगितले की “गेल्या वर्षी 9-10 टक्के आयकर रिटर्न शेवटच्या दिवशी भरले होते. गेल्या आर्थिक वर्षात शेवटच्या दिवशी 50 लाख रिटर्न भरले गेले.